!! सहर्ष स्वागत !! महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्या., पुणे !! Maharashtra Rajya Sahakari Sangh M. is celebrating Centenary Year From 13th July 2017 To 13 July 2018.

महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे उद्देश:-

  1. सहकारी संस्थांचे सभासद, भावी सभासद,सहकारी कार्यकर्ते आणि सहकारी संस्थांमधील सेवक यांना सहकारी शिक्षण व प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करणे,करवून घेणे तसेच सहकारी तत्वे, मुल्ये व कार्यप्रणाली लोकप्रिय करणे.

  2. सहकारी शिक्षणासंबंधीच्या सर्व बाबतीत एकसुत्रता घडवून आणणारी संस्था म्हणून काम करणे आणि सहकारी शिक्षणासंबंधीच्या प्रश्नांच्या बाबतीत तज्ञ संस्था म्हणून काम करणे.

  3. महाराष्ट्र राज्यातील सहकारी चळवळीवर परिणाम करणा-या निरनिराळ्या प्रश्नावर सहकारी कार्यकर्त्याच्या मताचे दिग्दर्शन करण्यास व योग्य त्या अधिकारी व्यक्तिपुढे किंवा ठिकाणी असे मत मांडण्यास राज्यातील सहकारी चळवळीचा प्रवक्ता म्हणून काम करणे,आणि या विषयाचा प्रचार करून या बाबत जनमत तयार करणे.

  4. सहकारी चळवळीच्या प्रसारास मदत करणे.

  5. सहकारी चळवळी संबंधीच्या प्रश्नांचा अभयास करणे व अशा कार्यास उत्तेजन देणे।तसेच सहकारी चळवळीसंबंधीचे संशोधन हाती घेणे।अशा कार्यास चालना देणे.शिवाय राज्यात सहकारी क्षेत्राचे संदर्भात सल्ला देणारे सेवा केंद्र म्हणून काम करणे.

  6. शिक्षण व प्रशिक्षण वर्ग जिल्हा सहकारी बोर्ड व सहकार प्रशिक्षण केंद्र अगर महाविद्यालये तसेच सहकारी व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था चालविणे.

  7. सहकार ग्रामिण विकास आणि तत्संबंधीच्या विषयावर नियतकालीके,पुस्तिका, पुस्तके आदी प्रकाशित करणे.

  8. सहकारी संस्थांतील परस्पर संबंध वृध्दींगत करणे आणि विविध क्षेत्रातील सहकारी संस्थांच्या कार्यामध्ये समन्वय साधण्यासाठी मदत करणे.